ब्रेकिंग न्यूज


महाराष्ट्र

कराडात फडणवीस यांची प्रचारतोफ धडाडणार


कराडात फडणवीस यांची प्रचारतोफ धडाडणार

कराड आणि मलकापूर नगरपालिकेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ कराड शहरातील दत्त चौकात रविवारी (ता. ३०) दुपारी २ वाजता भारतीय जनता पार्टीची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे

कराड:

कराड आणि मलकापूर नगरपालिकेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ कराड शहरातील दत्त चौकात रविवारी (ता. ३०) दुपारी २ वाजता भारतीय जनता पार्टीची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची प्रचारतोफ धडाडणार आहे.

कराड नगरपालिका आणि मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशावेळी भाजपाने थेट कराडमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा घेत निवडणुकीत मोठी रंगत आणली आहे. राज्याच्या राजकारणात अत्यंत प्रभावी आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या ना. फडणवीसांचे कराडमध्ये आगमन होणार असल्याने, नागरिक व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सभेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, खनिज कर्म महामंडळाचे संचालक भरत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, धैर्यशील कदम, सत्यजितसिंह पाटणकर, रामकृष्ण वेताळ, आनंदराव पाटील, विक्रम पावसकर, मकरंद देशपांडे, शारदा जाधव, रोहिणी शिंदे, नीलम येडगे, विनायक पावसकर, तेजस सोनावले उपस्थित राहणार आहेत.