ब्रेकिंग न्यूज


महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर ओबीसींचा घाला


मराठा आरक्षणावर ओबीसींचा घाला

कराड नगरपालिका निवडणुकीत आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्यानंतर अनेक वर्षांनी नगराध्यक्ष पदासाठी मराठा समाजाला शासकीय आरक्षण नियमावलीनुसार संधी मिळाली. मात्र संघटनात्मक वृत्तीच्या लोकांनी मराठा आरक्षणाच्या हक्कावर घाला घालत त्यांचे तिकीट हिसकावले. तर त्यांच्या हातावर हात मारत कॉंग्रेसने मराठा समाज बांधवांच्या संविधानिक हक्कावर घाला घातल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली वर्षानुवर्ष राजकारण करणारे राजकारणी व अप्रत्यक्षपणे त्याना हातभारच लावणाऱ्या कॉंग्रेसनीतीवर जातिवंत मराठ्यांनी यादवी वरवंटा फिरवावा, अशी भावना निर्माण झाली आहे.

मराठा आरक्षणावर ओबीसींचा घाला 


कराड नगरपालिका निवडणुकीत राजकीय षडयंत्र; हक्काचे आरक्षण मिळूनही मराठ्यांवर अन्याय 


पराग शेणोलकर 

कराड:


कराड नगरपालिका निवडणुकीत आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्यानंतर अनेक वर्षांनी नगराध्यक्ष पदासाठी मराठा समाजाला शासकीय आरक्षण नियमावलीनुसार संधी मिळाली. मात्र संघटनात्मक वृत्तीच्या लोकांनी मराठा आरक्षणाच्या हक्कावर घाला घालत त्यांचे तिकीट हिसकावले. तर त्यांच्या हातावर हात मारत कॉंग्रेसने मराठा समाज बांधवांच्या संविधानिक हक्कावर घाला घातल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली वर्षानुवर्ष राजकारण करणारे राजकारणी व अप्रत्यक्षपणे त्याना हातभारच लावणाऱ्या कॉंग्रेसनीतीवर जातिवंत मराठ्यांनी यादवी वरवंटा फिरवावा, अशी भावना निर्माण झाली आहे. 

येन केन प्रकारे सत्ता मिळवणाऱ्या भारतीय जनता पार्टीत आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. त्यामुळे आयत्यावेळी आलेल्या आयारामांमुळे निष्ठावंत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांवरही मोठा अन्याय होत आहे. वर्षानुवर्ष हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांनी  या निवडणुकीतही एकाच घरात दोन उमेदवार दिले आहेत. सोमवार पेठेत त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणी निष्ठावंत नाहीत का? खुल्या प्रवर्गातील लोकांनी आयुष्यभर फक्त सतरंज्याच उचलाव्यात की काय?असा सवाल उपस्थित होत आहे.

नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे प्रमुख दावेदार असलेले सुहास जगताप, अतुल  शिंदे, समाधन चव्हाण यांच्या गळयावर संघटनात्मक प्रवृत्तीने सुरा फिरवला. कार्यकर्तृत्वाच्या जोरावर जगताप, शिंदे, चव्हाण यांना उमेदवारीचा दावा केला असताना, जिल्हाध्यक्ष, आमदारांचा निर्णय बदलून आपल्या ताकदीच्या जोरावर तत्कालीन जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, हिंदू एकताचे विनायक पावसकर यांनी मोठी राजकीय खेळी करत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली. तर दुसरीकडे खुले आरक्षण असतानाही सोमवार पेठेतील सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांना डावलून आणि त्यांच्याच घरात उमेदवारी मिळवण्यात पावसकर यशस्वी झाले. यामुळे सोमवार पेठेतील लोकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे. परिणामी भाजपचे माजी नगरसेवक घनशाम पेंढारकर, आणि वास्के मेहरबान यांनी आपला स्वाभिमान बाळगून माजी पालक मंत्री बाळासाहेब पाटील आणि राजेंद्र यादव यांच्या हातात हात साथ दिली आहे. त्यात कॉंग्रेसलाही मराठा समाजाचा विसर पडला, हे विशेष.


आदरणीय पी. डी. पाटील साहेबांनी तब्बल ४३ वर्षे कराडचे नगराध्यक्ष पद भूषवत गिनीज बुकात कराडचा इतिहास नोंदवला. अंडरग्राउंड ड्रेनेज योजना, पाणीपुरवठा योजना, नगरपालिका इमारत, शिवाजी स्टेडियम, टाऊन हॉल, यशवंतराव चव्हाण समाधी, प्रीतिसंगम गार्डन अशांसारख्या अनेक मोठी विकासकामे केली. त्यांच्यानंतर त्यांच्या घरातील सुभाष पाटील, जयंत पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आणि सौरभतात्या पाटील यांनीही कराडचे विकासात मोलाची भर घातली. परंतु पी. डी. पाटील साहेबांच्या नंतर अनेक वर्षांनी मराठा समाजाला नगराध्यक्ष पदाची उमेदवार मिळूनही स्वतःच्या घरात तिकीट न घेता इतर मराठा समाज बांधवांना संधी मिळण्याच्या उदात्त हेतूने या निवडणुकीत पाटील घराण्यातील एकही उमेदवार दिलेला नाही. हा राजकीय त्याग एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पावस्कर घराण्यातील संघटनात्मक वृत्ती यात टोकाचा विरोधाभास आहे, याची सुज्ञ व दक्ष कराडकर तसेच यशवंत विचारांचे पाईक असलेल्या नागरिकांना चांगलीच जान आहे.

कराडकर पालिका प्रशासन हाताळण्याचा चांगला अभ्यास असलेला अनुभवी मराठा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून देतील आणि यशवंत विचारधारेवर वाटचाल करणाऱ्या पालिकेत संघटनात्मक विचारधारेचा शिरकाव रोखतील, असा विश्वास व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान कराडकर मराठा समाजबांधब जागृत आहेत की झोपी गेलेत, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. 

भाजपच्या निष्ठावंतांचा घात

माजी नगरसेवक पेंढारकर, एकनाथ बागडी हे रात्रंदिवस जनतेच्या सोयींसाठी पक्ष वाढीसाठी धडपडणारी व्यक्तिमत्वे. मात्र त्यांना तिकीट डावलण्यात आल्याने  पेंढारकर आणि वास्के मेहरबान यांनी वेगळी वाट धरली आहे. 

सौ सोनार की... तो एक लोहार की 

कोरोनात जीवाची भीतीने बाळगता रस्त्यावर उतरून घराघरात औषधे, किराणा साहित्य आणि भाजीपाला पोहोचवण्यापर्यंत धडपडलेल्या सुहास जगताप, शिंदे, चव्हाण नगराध्यक्ष पदाचे तिकीट कापून मराठा समाजावरही या संघटनात्मक वृत्तीने अन्याय केला आहे. अनेक प्रभागांतही खुले आरक्षण डावलून अन्य जातींचे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे फक्त मोर्चा पुरता जागा होणारा एक मराठा लाख मराठा केव्हा जागा होणार! मराठा बांधवांसह कॉंग्रेस, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते "सौ सोनार की... तो एक लोहार की" ही म्हण सार्थ ठरवत या अन्यायाविरोधात पेटून उठून सत्याचा विजय करतील का? हे येणारा काळच ठरवेल.

                                                 क्रमश: