ब्रेकिंग न्यूज


महाराष्ट्र

नगरपालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवरच भूमिका घ्या


नगरपालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवरच भूमिका घ्या

कराड/प्रतिनिधी : -


नगरपालिका निवडणुकीत महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाकडून पाठिंब्यासंदर्भात अद्याप चर्चा न झाल्याने, दलित महासंघाने स्थानिक पातळीवर स्वबळावर निर्णय घेण्याचा संकेत दिला आहे. कराड येथे झालेल्या संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सातारासांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.


बैठकीला दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडेकोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडेसांगली जिल्हा प्रभारी बळीराम रणदिवेसातारा जिल्हाध्यक्ष उमेश खंडूझोडेतसेच पदाधिकारी राम दाभाडेरमेश सातपुतेराहुल वायदंडेतुकाराम वालेकरअनिल थोरातधनाजी सकटेमहावीर सर्वगौडदिनकर वायदंडेसौ. अरुणा कांबळेसंपतराव कांबळेराजेंद्र जावीर आदी उपस्थित होते.


महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन इच्छुक कार्यकर्त्यांकडून मतदार गट व गणाची माहिती प्रस्तावित केल्यास, महासंघ महायुतीसमोर जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.


याच बैठकीत अनुसूचित जाती आरक्षणातील वर्गीकरण (ABCD) प्रश्नासंदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्याच्या तयारीचा आढावा घेऊन प्राथमिक नियोजन करण्यात आले. बैठकीचे स्वागत रमेश सातपुते, प्रास्ताविक राम दाभाडे यांनी, तर अनिल थोरात यांनी आभार मानले.